#वास्तुपुरुष म्हणजे काय ?
वास्तुपुरुष म्हणजे आपल्या वास्तूचे रक्षणकर्ता.
जो कोणी स्वतःसाठी नवीन वास्तू निर्माण करतो, तेव्हा राहण्याआधी वास्तुपुरुषाचा निक्षेप करावा लागतो. त्यामुळे सुखसमृद्धी, आर्थिकस्थैर्य, सर्वांचे कल्याण आणि विचारांमध्ये व बोलण्यामध्ये सकारात्मकता यावी म्हणून वास्तुपुरुषाचा विधिवत निक्षेप केला जातो.
वास्तुपुरुष कोणत्या दिशेस व कोणत्या कोपऱ्यात निक्षेप करतात ?
वास्तूच्या आग्नेय कोपऱ्यात खड्डा खोदून किंवा त्या भागातली फरशी बसवण्याचे काम मागे ठेवलेलं केव्हाही चांगले. कारण त्याभागात वास्तुपुरुषाचा निक्षेप करावा लागतो. खूप अधिक लोकांना माहित नसत आणि फरशी काम पूर्ण करतात सरते शेवटी खड्डा काढण्यासाठी बसवलेल्या फरशीची तोडफोड करावी लागते, तसेच शास्त्र सांगते तयार वास्तूची तोडफोड करणे अशुभ आहे.
वास्तुपुरुषाच्या निक्षेप करतेवेळी कोणती काळजी घेयला हवी ?
तर, वास्तुपुरुषाचे डोके ईशान्य दिशेस, पाय नैऋत्य, एक हात आग्नेयला, दुसरा हात वायव्यला ठेवून निक्षेप करावा, म्हणजेच तो खड्डा बंद करावा.
वास्तुपुरुषाचा निक्षेप केल्यानंतर त्या ठिकाणाची रोज पूजा करावी का ?
सणवार असतो त्या दिवशी जसे घरांमधील देवाला नैवद्य दाखवतो, तसा स्वतंत्र नैवद्य तयार करून वास्तुपुरुषाला दाखवावा.
वास्तुपुरुष आपल्या राहत्या घरात नेहमी एक वरदान देत असतो, ते वरदान म्हणजे
“तथास्तु “
“तथास्तु ” वरदानाचा फायदा आणि तोटा थोडक्यात समजून घेऊ –
आता आपली वास्तू तयार आहे आणि आपण सज्ज आहोत त्या महालात राहण्यास, आपली चर्चा आणि विचार इतरांना दोष देत असतील, शिव्याशाप , माझी आर्थिक अडचण, मला माझी तब्बेत ठीक नाही वाटत, मला नोकरी नाही मिळत, या घरात माझा सोबत छळ होतो, माझा व्यवसाय ठीक नाही, असत्य बोलणे याचा थेट परिणाम त्या घरातल्या मंडळींवर होत असतो.
उदा, – एखादा बॉल आपण समोरचा भिंतीवर मारावा आणि तो बॉल पलीकडे न जात आपल्याकडेच माघारी येतो तसा आपण केलेल्या नकारात्मक विचार आणि भावना तश्याच आपल्याला मिळतात, म्हणून स्वतःच्या कल्याणासाठी सतत सकरात्मक आणि शुभ विचार करणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जे जे मनात आणणार आहे तेव्हा वास्तुपुरुष एकच आशीर्वाद देणार आहे तो म्हणजे ” तथास्तु “
#सुंदर_घराचं_स्वप्न_साकार_करणारी_माणसं
#YashVastu
#वास्तुशास्त्र
खूप छान माहिती
Thank You.